BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने भव्य रायफल शूटिंग स्पर्धेचा शुभारंभ

शिवसेना रायफल शूटिंग स्पर्धा - कोल्हापूर

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने भव्य रायफल शूटिंग स्पर्धेचा शुभारंभ

कोल्हापूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून, कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रायफल शूटिंग स्पर्धेचा सोमवारी उत्साहात शुभारंभ झाला. शिवाजी पेठेतील पेटाळा मैदानालगत असलेल्या शूटिंग रेंजवर ही स्पर्धा पार पडत आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन मुंबईचे शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते पार पडले.

"शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असणारे विधायक आणि क्रीडाविषयक उपक्रम येत्या काळात शिवसैनिक मोठ्या प्रमाणात राबवणार आहेत. शहर प्रमुख मंजित माने यांनी आयोजित केलेली ही रायफल शूटिंग स्पर्धा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी मोठे पाठबळ देणारी ठरेल."

— अरुण दुधवडकर (संपर्कप्रमुख, मुंबई)

शहर प्रमुख मंजित माने यांच्या नियोजनाखाली आयोजित या स्पर्धेत पहिल्याच दिवशी सुमारे ७५ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा पुढील तीन दिवस चालणार असून, विविध वयोगटांतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

🚩 उपस्थित मान्यवर व पदाधिकारी:
शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, महिला जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुंरे, शहर प्रमुख मंजित माने, विशाल देवकुळे, विराज पाटील, अवधूत साळोखे, दिनेश साळोखे, चैतन्य देशपांडे, दीपक गौड, कनिष्क शिंदे, स्मिता सावंत, अनिते ठोंबरे, दीपाली शिंदे, सुमित मेळवंकी, धनंजय मेहंदरकर, अक्षय मोरे, आदित्य हुलजी, दिलीप देसाई, हर्षल पाटील, रुपेश रोडे, चंदू भोसले, तृप्ती विभुते, नगरसेवक दुर्वास कदम, सागर साळोखे आदी मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने