BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

लिंकिंग केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

लिंकिंग केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

खरीप हंगामासाठी बियाणे व खतांचा वेळेत पुरवठा करण्याचे आदेश

कोल्हापूर : जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खते, बियाणे व कीटकनाशके यांचा पुरवठा, उपलब्धता, दर्जा नियंत्रण व नियोजन याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस उपस्थित : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगरे, कृषि विकास अधिकारी राजेंद्र माने, मोहीम अधिकारी (जिल्हा परिषद) सुशांत लव्हटे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी शेणवे यांच्यासह तालुका स्तरावरील कृषि अधिकारी व निरीक्षक उपस्थित होते.
पुरवठा नियोजन

सर्व बियाणे उत्पादक कंपन्यांना खरीप हंगामासाठी वेळेत व मुबलक प्रमाणात बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. खत कंपन्यांनी पुढील १५ दिवसांचा सविस्तर पुरवठा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले.

⚠️ कठोर कारवाईचा इशारा

खत विक्रीमध्ये 'लिंकिंग' आढळल्यास अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील. किरकोळ विक्रेत्यांवर खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कारवाई होईल.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे:

डीएपी खताच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना 20:20:0:13 तसेच टी.एस.पी. या पर्यायी खतांचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले. मागील बाकी किंवा अतिरिक्त शुल्क बिलात लावणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बफर स्टॉक: युरिया व डी.ए.पी. खतांचा संरक्षित (बफर) साठा वेळेत १०० टक्के पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कृषि विभागाने बाजारपेठेवर सतत नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात. - जिल्हा प्रशासन

थोडे नवीन जरा जुने