BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

येत्या काळात महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत

महाराष्ट्र डेटा सेंटर हब - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दावोस जागतिक आर्थिक परिषद करार

येत्या काळात महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत

— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस —

स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या कराराच्या अनुषंगाने राज्यातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन वाटप, परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावी.

१० अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी १० प्रकल्पांची जबाबदारी

सामंजस्य कराराच्या अनुषंगाने प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी एमआयडीसी, उद्योग संचालनालय आणि मंत्रालयातील १० प्रमुख अधिकाऱ्यांना प्रत्येकी १० प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, याची जबाबदारी देण्यात येणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीचा आणि त्यानंतर राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सहायभूत सेवा धोरण व एकात्मिक हरित डेटा सेंटर पार्क धोरण-२०२४ अंतर्गत स्थापित झालेल्या डेटा सेंटर्सच्या सद्यःस्थितीविषयी आढावा घेतला.


मुख्यमंत्र्यांचे प्रमुख निर्देश

३ महिन्यांची कालमर्यादा

प्रशासनाने कंपन्यांच्या पाठपुराव्याची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन जमीन वाटप, पर्यावरण मंजुरी, बांधकाम आराखडे पुढील तीन महिन्यांत पूर्ण करावेत.

मुबलक ऊर्जा आणि पाणी

डेटा सेंटरसाठी लागणारी ऊर्जा आणि पाणी महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. प्रक्रिया सुलभीकरणावर अधिक भर देऊन जागा वितरण वाढवावे.

विकसित होणारे प्रमुख क्लस्टर्स

नवी मुंबई (महापे)

प्रमुख डेटा सेंटर हब

खालापूर

तिसरे महत्त्वाचे क्लस्टर

पनवेल परिसर

पायाभूत सुविधा बळकटीकरण

प्राधान्य क्षेत्रे:

इलेक्ट्रॉनिक्स चिप्स एरोस्पेस वस्त्रोद्योग वाहन उद्योग संरक्षण क्षेत्र डेटा सेंटर आयटी-आयटीईएस फिनटेक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी)

सिडको प्रकल्पांचा आढावा

एरोसिटी परिसरातील विद्यापीठ प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, एंटरटेनमेंट हब, डेटा सेंटर आणि स्टुडिओ अपार्टमेंट्स प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

उपस्थित वरिष्ठ अधिकारी
माधुरी मिसाळ
राज्यमंत्री
आभा शुक्ला
अपर मुख्य सचिव, ऊर्जा विभाग
डॉ. पी. अन्बळगण
प्रधान सचिव, उद्योग विभाग
डॉ. संजय मुखर्जी
महानगर आयुक्त
पी. वेलारासु
सीईओ, एमआयडीसी
विजय सिंघल
व्यवस्थापकीय संचालक, सिडको

आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी

महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

© २०२४ सर्व हक्क सुरक्षित. महाराष्ट्र शासन

थोडे नवीन जरा जुने