BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

सुधार गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात गती आणा - आमदार राजेश क्षिरसागर

पाणी पुरवठा योजना आढावा - न्यूज
कोल्हापूर | १५ मे २०२६

"सुधार गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात गती आणा; नागरिकांच्या पाणी प्रश्नाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही"

- आमदार राजेश क्षीरसागर

योजनेची किंमत: ३४३ कोटी रुपये

करवीर तालुक्यातील सुधार गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या भव्य योजनेमुळे परिसरातील १३ गावांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याचा लाभ होणार आहे.

आमदारांचा सज्जड दम:
"पाणी प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा किंवा भ्रष्टाचारी वृत्ती खपवून घेतली जाणार नाही. काम टाळणाऱ्या ठेकेदारांना थेट ब्लॅकलिस्ट करा!"

बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. पाटील यांनी माहिती दिली की, योजनेचे ५१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित कामासाठी आमदार क्षीरसागर यांनी कडक मुदत आखून दिली आहे. विशेषतः रस्ते खुदाईमुळे होणारा त्रास लक्षात घेता, खोदलेले रस्ते पुढील एका महिन्याच्या आत दुरुस्त करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

बैठकीस उपस्थित मान्यवर:
  • • डॉ. विजय राठोड (जिल्हाधिकारी)
  • • डॉ. जास्मिन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.)
  • • डी. के. पाटील (कार्यकारी अभियंता, MJP)
  • • पी. एच. गायकवाड (उपअभियंता)
थोडे नवीन जरा जुने