'करवीर हायकर्स' च्या सातजणांची तिरंगा फडकवून, संविधान उद्देशिका प्रदर्शनाने 'एव्हरेस्ट बेस कँप' मोहीम यशस्वी!
रत्नागिरी, दि. २५ मे २०२६
कोल्हापूरच्या 'करवीर हायकर्स' च्या सातजणांनी अत्यंत प्रतिकूल हवामानातील आणि खडतर अशी समुद्र सपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर पोहचत 'एव्हरेस्ट बेस कँप' मोहीम शनिवारी यशस्वी केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया यांचा यात समावेश आहे.
मोहिमेची सुरुवात
'एव्हरेस्ट बेस कँप'साठी भगवान गौतम बुद्धांच्या जन्मभूमीत नेपाळ-काठमांडूत १५ मे रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, चिपळूण येथील बी के वालावलकर रुरल मेडिकल कॉलेजच्या सहप्राध्यापक डॉ. सुप्रिया सातपुते, मुरुम (धाराशिव) चे उद्योजक आप्पासाहेब मुंडासे, कोल्हापूरचे उद्योजक विशाल मेहता, समाज माध्यम प्रभावक पती पत्नी नुपूर आणि अक्षय मठकर दाखल झाले.
काठमांडू ते जगातील सर्वात धोकादायक ओळख असणाऱ्या लुकला विमानतळ येथून छोट्या विमानप्रवासानंतर प्रत्यक्षात 'इबीसी' कडे वाटचालीला सुरुवात झाली.
असा होता खडतर ट्रेक मार्ग:
राष्ट्रीय ध्वज आणि संविधान उद्देशिका
शनिवार दि. २३ मे रोजी राष्ट्रीय ध्वज फडकवून आणि संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करुन या यशस्वी मोहिमेची सांगता झाली.
उणे १५ अंश सेल्सिअस तापमान!
रात्री उणे १५ अंश सेल्सिअस तर दिवसा ४ ते ६ अंश सेल्सिअस तापमान, लोबूचे ते 'इबीसी' अतिशय जीवघेणा प्रवास ठरला. प्रतिकूल, खडतर वातावरण, दुर्गम रस्ता, हाडे गोठवणारे थंड वारे मानसिक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी जागोजागी घेत होते. वाटेत येणाऱ्या अशा आव्हानांना शरीर आणि मन सक्षमपणाने सामोरे जावू शकते, हे या ट्रेकवरून या पथकाने अनुभवले.
मार्गदर्शक भूमिका: नेपाळमधील 'पीक १५ ॲडव्हेंचर' चे शेखर तमांग, योगेंद्र तमांग व प्रशांत तमांग यांनी या मोहिमेत मार्गदर्शक म्हणून मोलाची भूमिका निभावली.
मोहिमेची वैशिष्ट्ये
५,३६४ मी.
समुद्र सपाटीपासून एकूण उंची
-१५°C
रात्रीचे हाडे गोठवणारे तापमान
