BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीतून ६.५० लाखांचे दान; कोल्हापूरकरांचा दातृत्वाचा ओघ सुरूच

बातमी: पंचगंगा स्मशानभूमी दान

पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीतून ६.५० लाखांचे दान; कोल्हापूरकरांचा दातृत्वाचा ओघ सुरूच

कोल्हापूर महानगरपालिका | सामाजिक उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी):

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी आणि बापट कॅम्प येथील स्मशानभूमींमध्ये मोफत अंत्यसंस्काराची सोय करण्यात येते. या ठिकाणी येणारे नागरिक आणि दानशूर व्यक्ती अंत्यसंस्कार तसेच रक्षाविसर्जनासाठी आल्यावर येथील गुप्तदान पेट्यांमध्ये सढळ हाताने दान करतात. नुकतीच पंचगंगा स्मशानभूमी येथील दानपेटी उघडण्यात आली असून, यामध्ये सुमारे ६ लाख ४९ हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोजणी

बुधवारी सकाळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही दानपेटी उघडण्यात आली. यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते:

  • स्वाती दुधाने - सहाय्यक आयुक्त
  • जयवंत पवार - मुख्य आरोग्य निरीक्षक
  • बाजीराव ढोणे - वरिष्ठ लेखापाल
  • शुभांगी पवार - आरोग्य निरीक्षक
  • नंदकुमार पाटील, प्रकाश लोंढे, सुरज घुणकीकर, महेश भोसले आणि इतर कर्मचारी.

दानाची आकडेवारी

रोख रक्कम

₹ ४,१९,६७५/-

ऑनलाइन स्वरूप

₹ २,३०,१०९/-

एकूण जमा

₹ ६,४९,७८४/-

दानामध्ये मोठी वाढ

यापूर्वी मार्च २०२५ मध्ये जेव्हा स्मशानभूमीकडील दानपेट्या उघडण्यात आल्या होत्या, तेव्हा पंचगंगा स्मशानभूमीतून १ लाख ६१ हजार ५३७ रुपये जमा झाले होते. त्या तुलनेत यंदा नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला असून दानाच्या रकमेत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

स्मशानभूमीकरिता केवळ रोख स्वरूपातच नव्हे, तर अनेक दानशूर व्यक्ती, तरुण मंडळे आणि नागरिकांकडून शेणी आणि लाकूड दान करण्यासाठीही मोठा प्रतिसाद मिळतो.
थोडे नवीन जरा जुने