BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कंत्राटदार नोंदणीस १५ मे पर्यंत मुदतवाढ

कंत्राटदार नोंदणी मुदतवाढ - कोल्हापूर

* कंत्राटदार नोंदणीस १५ मे पर्यंत मुदतवाढ *

कोल्हापूर जिल्हास्तरीय समितीचा महत्वपूर्ण निर्णय

LATEST UPDATE कोल्हापूर

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते कामासाठी आवश्यक यंत्रसामग्री व साहित्यपुरवठा करणे यांचे दर जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेले आहेत. विधानसभास्तरीय समितीने निश्चित केलेल्या कामासाठी कामे करण्यास इच्छुक असणाऱ्या ग्रामविकास/सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत असणाऱ्या मक्तेदार यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कामे वाटप करण्यात येणार आहेत.

मुदतवाढ अलर्ट: इच्छुक मक्तेदारांकडून अर्ज व तांत्रिक अटी पूर्ततेचे कागदपत्रे मागविण्यासाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

समाविष्ट विधानसभा मतदारसंघ:

२७४ कोल्हापूर दक्षिण
२७५ करवीर
२७६ कोल्हापूर उत्तर
महत्वाच्या अटी व शर्ती:
  • वरील ०३ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी नोंदणीकृत मक्तेदार यांची मतदारसंघनिहाय पॅनेलमध्ये नावे समाविष्ट केली जातील.
  • मक्तेदारांकडे ग्रामविकास किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची नोंदणी असणे अनिवार्य आहे.
  • सोबत जोडलेल्या अटी व शर्तीनुसार मंजूर केलेली कामे करण्यास इच्छुक असणाऱ्यांनीच अर्ज सादर करावेत.
मुदतीनंतर येणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
थोडे नवीन जरा जुने