BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

महापालिका व शहर वाहतूक शाखेची संयुक्त बैठक संपन्न

कोल्हापूर शहर वाहतूक नियोजन बैठक

कोल्हापूर शहर वाहतूक नियोजन

महापालिका व शहर वाहतूक शाखेची संयुक्त बैठक संपन्न

कोल्हापूर | ता. १३ प्रशासकीय बातमी

डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय

डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली शहर वाहतूक नियोजनाबाबत आज दुपारी महापालिका व शहर पोलिस वाहतूक विभागाची संयुक्त बैठक आयुक्त कार्यालयात पार पडली. शहरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण, पार्किंग व्यवस्था आणि सिग्नल यंत्रणा सुधारण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.


प्रमुख सूचना व निर्णय

  • अतिक्रमणमुक्त कोल्हापूर: अंबाबाई मंदिर परिसर, मुख्य रस्ते आणि फुटपाथ तातडीने अतिक्रमणमुक्त करण्यावर भर.
  • पर्यटन विकास: मंदिर परिसर व रंकाळा तलाव परिसर पर्यटकांच्या दृष्टीने स्वच्छ व मोकळा ठेवण्याचे निर्देश.
  • सिग्नल यंत्रणा: शहरातील खराब झालेले सिग्नल बदलण्यासाठी तांत्रिक तपशील सादर करून निविदा प्रक्रिया राबवणार.
  • खाजगी पार्किंग: परवाना शुल्क व अटी-शर्तींसह खाजगी पार्किंग सुरू करण्यासाठी नवीन धोरण निश्चित.
  • बेवारस वाहने: रस्त्यावरील बेवारस वाहने जप्त करण्यासाठी संयुक्त मोहीम.

कडक कारवाईचा इशारा

गाडी अड्डा परिसर: येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी ५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर सर्व साहित्य जप्त करण्यात येईल.

महावितरण: महापालिकेच्या परवानगीशिवाय रस्त्यावर नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्यास बंदी. आयुक्तांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

ठिकाणनिहाय नियोजन

सरस्वती टॉकीज

गाळेधारकांना दोन दिवसांत आतमध्ये स्थलांतरित होण्याच्या सूचना.

गाडी अड्डा

पार्किंग सुविधेसाठी तात्काळ एस्टीमेट सादर करून निविदा प्रक्रिया राबवावी.

रंकाळा व मंदिर

सततची कारवाई करून परिसर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवण्याचे निर्देश.

बैठकीस उपस्थित अधिकारी

नाव पद / विभाग
रविकांत आडसूळअतिरिक्त आयुक्त
जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटीलसहा. आयुक्त
नंदकुमार मोरेपोलीस निरीक्षक (वाहतूक शाखा)
रमेश मस्करशहर अभियंता
अरुण गुजर, निवास पोवारउपशहर अभियंता
शितलकुमार साळोखेइस्टेट ऑफिसर
नारायण पुजारी, सुरेश पाटील, प्रिया पाटीलविद्युत व शाखा अभियंता

© २०२६ कोल्हापूर महानगरपालिका - शहर वाहतूक शाखा

विकसित व नियोजित शहर, आमचे कोल्हापूर
थोडे नवीन जरा जुने