BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजाची जादू!

मामाच्या गोव्याला जाऊया - टायटल साँग

मामाच्या गोव्याला जाऊया!

नवीन पार्टी अँथम!

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजाची जादू!

फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात मैत्री, धमाल आणि नॉस्टॅलजियाची मसालेदार ट्रीट घेऊन येणाऱ्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचं धमाकेदार टायटल साँग प्रदर्शित झालं आहे. ‘मामाच्या गावाला जाऊया’ या बडबडगीताच्या चालीवर ठेका धरायला लावणारं हे गीतही तुम्हाला नॉस्टॅलजिक करणारं आहे.

शब्दांनीच तुम्हाला गोव्याच्या माहोलची सफर घडवणाऱ्या या गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायकही अवधूत गुप्ते आहेत. त्यांच्या युथफुल एनर्जिटीक आवाजाने आणि संगीताने त्यांनी या गाण्याला अल्टिमेट पार्टी आणि मस्ती साँगचा बाज दिला आहे.

अवधूत गुप्ते म्हणतात:
"हे गाणं गातानाच मला त्याची भन्नाट एनर्जी जाणवत होती. गोव्याची मजा, दोस्तीची धमाल आणि तरुणाईचा जोश यात भरभरून आहे. हे गाणं लोकांच्या प्लेलिस्टमध्येच नाही तर त्यांच्या ट्रिप प्लॅनमध्येही जागा बनवेल!"
दिग्दर्शक विजू माने म्हणतात:
"हे फक्त गाणं नाही, तर एक भन्नाट अनुभव आहे. प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यासाठी सध्या हे गाणं एआयच्या दृश्यातून समोर आणले असून मूळ दृश्य यापेक्षा कमाल असणार आहे. हे गाणं अक्षरशः वेड लावेल!"

विजुमेनिया प्रा. लि. आणि लाईट अँड शेड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. ३१ जुलै रोजी फ्रेंडशिप डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

- मुख्य भूमिका आणि टीम -
अंकुश चौधरी
कुशल बद्रिके
अभिजीत चव्हाण
संतोष जुवेकर

पटकथा व संवाद: विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके

थोडे नवीन जरा जुने