BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा...

तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा...
Woman Strength Concept

"तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा..."

काही दिवसांपूर्वी 'ऐकण्यात आलेले आनंदी गोपाळ' चित्रपटातील 'तू आहेस ना' हे सुंदर गाणे पुन्हा एकदा कानावर आले. पण यावेळी वैभव जोशी यांचे शब्द आणि सुप्रसिद्ध गायकांच्या आवाजातील हे गीत पुन्हा एकदा मनाला स्पर्श करून गेले.

विशेषतः या गाण्यातील शेवटचा अंतरा खूप काही सांगून जातो:

अहोभाग्य अमुचे
तुझ्या या ललाटी
आम्हा प्राप्त झाली
जरा सार्थता...
तुला फक्त तू जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा...

मानवाचा जन्म हा एका स्त्रीशिवाय होऊच शकत नाही. स्त्रीच्या अस्तित्वामुळेच प्रत्येक पुरुषाला त्याच्या जन्माची सार्थकता लाभते. जर स्त्री नसेल, तर तो पुरुषार्थ 'वांझ' म्हणजेच अर्थहीन ठरतो. या ओळी किती भावस्पर्शी आहेत ना!

आज ज्या स्त्रीला समाजात अनेकदा दुय्यम दर्जा दिला जातो, खरं तर तिच्याशिवाय पुरुष हा पूर्णपणे अपूर्ण आहे. हे गाणं म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर स्त्रीत्वाचा एक मोठा गौरव आहे.

आजच्या काळात जेव्हा आपण प्रगतीच्या गोष्टी करतो, तेव्हा या गाण्यातील अर्थ पुन्हा एकदा जगण्याची गरज आहे. स्त्रीचे अस्तित्व हे केवळ पुरुषाला पूर्ण करण्यासाठी नाही, तर या जगाला 'मानवता' शिकवण्यासाठी आहे. खरोखर, हे गाणं ऐकलं की जाणवतं तिच्या कपाळावरचं भाग्य म्हणजेच आपल्या सर्वांच्या आयुष्याची सार्थकता आहे!

*कर्तृत्वाचा मान तुझा, तूच धैर्याची मूर्ती*
*तुझ्या एका हुंकाराने, मिळते विश्वाला स्फूर्ती...*

लेखिका:

दर्शना पाटील
थोडे नवीन जरा जुने