BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

सतेज चषक फुटबॉल : प्रॅक्टिसवर मात करत पाटाकडील तालीम उपांत्य फेरीत

सतेज चषक फुटबॉल बातमी

सतेज चषक फुटबॉल : प्रॅक्टिसवर मात करत पाटाकडील तालीम उपांत्य फेरीत

कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धा

पाटाकडील तालीम मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा २-१ असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात पाटाकडीलने पिछाडीवरून येत विजय मिळवला.

सामन्याचा वृत्तांत:

सामन्याच्या सुरुवातीला ८ व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या अजिंक्य नलवडेच्या पासवर सागर चिलेने गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, पाटाकडीलने प्रतिआक्रमक खेळ करत १४ व्या मिनिटाला अमीन काजीरच्या पासवर यशराज कांबळेने गोल करत सामना १-१ अशा बरोबरीत आणला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते.

उत्तरार्धात ४९ व्या मिनिटाला पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे-पाटीलने दिलेल्या पासवर अमीन काजीरने निर्णायक गोल केला आणि संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. प्रॅक्टिस संघाने ही आघाडी मोडून काढण्यासाठी अनेक चढाया केल्या, परंतु पाटाकडीलच्या बचावफळीने त्या यशस्वीपणे रोखल्या.


पाटाकडील तालीम उत्कृष्ट खेळाडू:
  • प्रथमेश हेरेकर, नबी खान, रोहित मंडलिक, रोमारियो, ऋषिकेश मेथे-पाटील
प्रॅक्टिस क्लब उत्कृष्ट खेळाडू:
  • सागर चिले, सूरज जाधव, साहिल डाकवे, प्रदीप शिंदे, रोहित भोसले, आकाश बावकुळ
थोडे नवीन जरा जुने