BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

ड्रेनेज आणि पाणी प्रश्नावरून नगरसेवकांमध्ये जुंपली; तांत्रिक मुद्द्यांवरून गजाली आजची सभा

कोल्हापूर: विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज पाणी, ड्रेनेज आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवरून अक्षरशः वादळी ठरली. सभेच्या सुरुवातीलाच नगरसचिवांच्या अनुपस्थितीवरून नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला, तर १०० कोटींच्या रस्ते कामातील निष्काळजीपणावरून प्रशासनाचे वाभाडे काढले. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याने सभागृहाचा पारा चांगलाच चढला होता.


नगरसचिवांच्या दांडीवर लाटकर संतापले

सभेची सुरुवातच वादळी ठरली. नगरसचिव वेळेवर हजर नसल्याने नगरसेवक राजू लाटकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "लोकप्रतिनिधी वेळेत येतात, मग जबाबदार अधिकारी कुठे आहेत?" असा सवाल करत त्यांनी संबंधित सचिवांवर कडक कारवाईची मागणी लावून धरली. या प्रकारामुळे प्रशासकीय शिस्तीवर सुरुवातीलाच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

पाणी अन् ड्रेनेजवरून 'शाब्दिक चकमक'

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि ड्रेनेजच्या मुद्द्यावर नगरसेवक आदिल फराज, शारंगर देशमुख आणि रिंकू देसाई यांच्यात तांत्रिक कारणांवरून जोरदार खडाजंगी झाली. "लोकांचे प्रश्न आधी ऐकून घ्या, तांत्रिक मुद्दे सांगून जबाबदारी झटकू नका," अशा शब्दांत नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली. या वादात स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विजय जाधव, मुरलीधर जाधव आणि ऋतुराज क्षीरसागर यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

१०० कोटींच्या रस्त्यावरून प्रशासनाचे 'वाभाडे'

नगरसेवक नियाज खान यांनी प्रशासकीय अनागोंदीचा पाढाच वाचला. आमदारांच्या निधीतून होणाऱ्या डोंगरे ते आईच्या पत्र्यापर्यंतच्या १०० कोटींच्या रस्ते कामात प्रचंड मनमानी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

"रस्ता पूर्ण होऊन २१ दिवस झाले, तरी नागरिकांच्या फोडलेल्या पाणी पाईपलाईन दुरुस्त करण्यात आलेल्या नाहीत. नवीन रस्ता पुन्हा खोदून ठेवला आहे, पण २१ दिवसांत एकही अधिकारी तिकडे फिरकलेला नाही. अखेर आम्हाला जेसीबी आणून काम करावे लागते," अशा शब्दांत खान यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

अभिनंदन आणि इतर मागण्या

सभेत काही सकारात्मक ठरावही मांडण्यात आले. कोल्हापुरात आयटी पार्क (IT Park) आणि स्वच्छतागृहांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल महायुतीच्या आमदार व खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान, नगरसेवक अभिजित खतकर यांनी पाणी आणि ड्रेनेजची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी केली.

या सभेला परिवहन सभापती सत्यजीत जाधव, नगरसेवक अभिजित मोकाशी, कौसर बागवान, अर्चना कोराणे, प्रतिज्ञा उतुरे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने