BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

कोल्हापुरात बालगोपाल तालीम मंडळ आयोजित 'चंद्रकांत चषक २०२६' फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन;


कोल्हापूर: येथील

कोल्हापूर | १८ मार्च २०२६

येथील बालगोपाल तालीम मंडळातर्फे आयोजित 'चंद्रकांत चषक २०२६' या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते चेंडूला किक मारून आणि आकाशात फुगे सोडून उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, हर्षल सुर्वे, संभाजी जाधव, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांच्यासह बालगोपाल तालमीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिलबहार तालीम मंडळाचा ३-० ने दणदणीत विजय

स्पर्धेचा उद्घाटनपर सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात खेळवण्यात आला. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांकडून जोरदार चढाया झाल्या. मात्र, २५ व्या मिनिटाला दिलबहारच्या स्वयं साळुंखे याने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत हीच आघाडी कायम राहिली.

निकाल: दिलबहार तालीम मंडळ (३) - (०) वाघाची तालीम

उत्तरार्धात ७१ व्या मिनिटाला संकेत वेसनेकर याने दुसरा गोल केला, तर सामन्याच्या अतिरिक्त वेळेत जैन याने तिसरा गोल नोंदवत दिलबहार संघाचा विजय निश्चित केला. दिलबहारकडून प्रथम भोसले, सार्थक मगदूम आणि फेबिन यांनी उत्कृष्ट खेळ केला, तर उत्तरेश्वरकडून अथर्व पाटील, शोयब बागवान आणि मयूर कदम यांनी झुंज दिली.

शिवाजी तरुण मंडळाची माघार; फुलेवाडीला वॉकओव्हर

दिवसाचा दुसरा सामना श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यात होणार होता. मात्र, श्री शिवाजी तरुण मंडळ काही कारणास्तव मैदानावर उपस्थित न राहिल्याने फुलेवाडी क्रीडा मंडळास पुढे चाल (वॉकओव्हर) देण्यात आली. पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत शिवाजी तरुण मंडळाने यापूर्वीच स्पर्धेतून माघार घेण्याचे जाहीर केले होते.

उद्याचे सामने (१९ मार्च):

  • १) संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ - दुपारी १:०० वाजता
  • २) खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब - दुपारी ४:०० वाजता

थोडे नवीन जरा जुने