BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

शिवाजी तरुण मंडळ आणि पीटीएम विजयी; हर्ष जरग आणि अमीन काजीर ठरले सामन्याचे मानकरी

कोल्हापूर: राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या दोन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आज शिवाजी तरुण मंडळ आणि पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ) या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय मिळवत मैदान मारले.


दिवसाच्या पहिल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत रंकाळा तालीमचा ४-० असा पराभव केला. सामन्याच्या अवघ्या ४ थ्या मिनिटाला हर्ष जरग याने उत्कृष्ट मैदानी गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १६ व्या मिनिटाला करन बांद्रे याने गोल नोंदवला. रंकाळा संघाच्या खेळाडूंकडून झालेल्या 'स्वयंगोल' (Self Goal) मुळे शिवाजी मंडळाची आघाडी ३-० झाली. उत्तरार्धात ५४ व्या मिनिटाला यश जांभळे याने चौथा गोल करत रंकाळा तालीमच पराभव केला

शिवाजी मंडळाकडून संकेत साळोखे (फॉरवर्ड), दर्शन पाटील (मिड) आणि विशाल पाटील व योगेश कदम (डिफेन्स) यांनी चोख कामगिरी बजावली. रंकाळाकडून विवेक पाटील, सोहम निकम आणि रोहित सुतार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. हर्ष जरग याला 'सामनावीर' (MOM) पुरस्काराने गौरवण्यात आले.

दुसऱ्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाने (PTM) सुभाषनगरचा ४-० अशाच फरकाने धुव्वा उडवला. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला नबी खानच्या पासवर अमीन काजीर याने पहिला गोल केला. पाठोपाठ ४० व्या मिनिटाला अमीनने दुसरा गोल नोंदवला. मध्यंतरानंतर ६७ व्या मिनिटाला ओमकार मोरेच्या पासवर ऋषिकेश मेथे याने गोल केला, तर ७० व्या मिनिटाला ओमकार मोरे याने स्वतः फ्री-किकवर देखणा गोल करत संघाला ४-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

पीटीएमच्या विजयात रोमारियो, प्रथमेश हेरेकर आणि अक्षय पायमल यांचा मोलाचा वाटा राहिला. सुभाषनगरकडून नितीन पोवार, प्रणव सुतार, मोहम्मद आफताब आणि आर्यन पांढरे यांनी झुंज दिली. दोन गोल करणाऱ्या अमीन काजीर याला 'सामनावीर' घोषित करण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने