BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

निष्ठेचे फळ आणि राजकीय समीकरणे; ८ स्वीकृत नगरसेवक

  कोल्हापूर: गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा पेच अखेर सुटला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील रिक्त असलेल्या आठ स्वीकृत नगरसेवक पदांसाठी तीनही प्रमुख पक्षांनी आपल्या



 उमेदवारांची नावे निश्चित..

या संदर्भात अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे पक्षांनी आपली अधिकृत पत्रे सुपूर्द केली असून, २० तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

पक्षनिहाय बलाबल आणि निवडलेली नावे या आठ जागांपैकी भारतीय जनता पक्षाला ३, काँग्रेसला ३ आणि शिवसेनेला २ जागा मिळाल्या आहेत राजकीय गणिते आणि पक्षांतर्गत निष्ठेचा विचार करून ही नावे ठरवण्यात आली आहेत.

• भारतीय जनता पक्ष: भाजपने प्राध्यापक जयंत पाटील, विजय जाधव आणि सुनील वाडकर यांची निवड केली आहे 

• काँग्रेस: काँग्रेसच्या वतीने मुस्ताक मलबारी आणि राहुल माने यांची वर्णी लागली आहे सुनील मोदी यांची निवड करण्यात आली आहे

• शिवसेना (शिंदे गट): रत्नेश शिरोळकर आणि प्रसाद चव्हाण यांची नावे निश्चित झाली आहेत 


निवडीमागील महत्त्वाची कारणे आणि पार्श्वभूमी या निवडीमध्ये अनेक दिग्गजांनी बाजी मारली असून, काही अनपेक्षित बदलही पाहायला मिळाले. प्राध्यापक जयंत पाटील हे भाजपच्या वतीने पाचव्यांदा स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रवेश करत आहेत, जे त्यांच्या अनुभवाचे आणि पक्षातील स्थानाचे प्रतीक आहे 

भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांना त्यांच्या ३० वर्षांच्या पक्षनिष्ठेचे फळ म्हणून पहिल्यांदाच ही संधी देण्यात आली आहे.तसेच, सुनील वाडकर जे १५ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत, त्यांच्या नावासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आग्रह धरला होता, ज्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला.

काँग्रेसकडून मुस्ताक मलबारी यांनी महापालिका निवडणुकीत पक्षासाठी केलेले मोठे काम आणि निवडून आणलेल्या जागांचा विचार करून त्यांना संधी दिली आहे तर, राहुल माने यांनी शारंगर देशमुख यांच्या विरोधात दिलेली झुंजार लढत पाहता, त्यांच्या पराभवानंतरही पक्षाने त्यांच्या कष्टाची दखल घेतली आहे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी नुकताच राजीनामा दिला होता, परंतु आमदार सतेज पाटील यांच्या रणनीतीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याने त्यांची निवड झाली आहे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसाद चव्हाण यांना दिलेला शब्द पाळला, तर शिरोळकर यांना त्यांच्या समन्वयक म्हणून केलेल्या चांगल्या कामाचे बक्षीस मिळाले आहे

थोडे नवीन जरा जुने