BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

शिक्षणातून घडलेले आणि समाजासाठी सज्ज झालेले एक महिला नेतृत्व : छाया किशोर पाटील.

 Team Newsskatta विशेष लेख 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागताच राजकारणाचा ताप वाढू लागला आहे. पण प्रभाग क्रमांक 14 मध्ये मात्र मतदारांच्या चर्चेत एकच नाव ठळकपणे उमटत आहे. शांत, सुसंस्कृत आणि पूर्णपणे नवा आशादायी चेहरा म्हणून ओळख मिळवणाऱ्या छाया किशोर पाटील यांच्याबद्दल मतदारांत एक वेगळाच विश्वास निर्माण झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे, अशी चर्चा प्रभागात जोरदार आहे आणि या चर्चेला लोकांचा प्रत्यक्ष प्रतिसादही मिळताना दिसतो.


गेल्या 30 वर्षांचा त्यांचा शिक्षक म्हणून प्रवास अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून गेला. शेकडो कुटुंबांच्या उबदार आठवणीत त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. शिक्षक म्हणून सुरुवात करून मुख्याध्यापिका म्हणून सन्मानाने निवृत्त होण्यापर्यंत त्यांनी शिक्षणक्षेत्रात आदर्श कामगिरी केली. मुलांच्या समस्या समजून घेण्याची त्यांची नजर आज समाजातील प्रश्नांपर्यंत थेट पोहोचत आहे. संयम, समजूतदारपणा आणि निर्णयक्षमता या तीन गुणांमुळे त्यांचे नेतृत्व आज अधिक परिपक्व झाले आहे.

‘रेणुका देवी’च्या माध्यमातून त्यांनी उभारलेला जनसंपर्क हा त्यांचा सर्वात मोठा भांडवला आहे. सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांची सातत्याने दिसणारी उपस्थिती लोकांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करते. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून तरुण पालकांपर्यंत सर्वांना त्यांच्यात एक विश्वास वाटतो कारण त्यांच्या संवादात राजकीय आडाखे नाहीत, तर मनापासून बोललेलं सत्य आहे.



त्यांची खास ओळख म्हणजे त्यांची स्वच्छ प्रतिमा. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजाच्या समस्यांकडे पाहण्याची त्यांची दृष्टिकोन अतिशय निर्मळ आहे. राजकारणात प्रवेश करताना कोणत्याही वारशाचा फायदा नसला, तरी लोकांचा विश्वास, त्यांच्या कामाची शिस्त आणि वागण्यातली साधेपणा हे त्यांच्या नेतृत्वाचे खरे बळ आहे.

या सर्व प्रक्रियेत पाटील कुटुंबाची छापही प्रखरपणे जाणवते. अनेक वर्षांपासून समाजकारणात सक्रिय असलेले हे कुटुंब आपत्कालीन परिस्थितीत, पूर असो वा कोविडचा कठीण काळ नेहमी लोकांसाठी पुढे धावले. त्यांचं कार्य बोलावं लागत नाही; त्यांच्या उपस्थितीनेच लोकांना आश्वस्त वाटतं.

या परंपरेत नव्या पिढीची ऊर्जा भरते ती संदीप पाटील आणि प्रियांका पाटील यांच्या कामातून. शांत स्वभाव, पण अथक काम करण्याची वृत्ती यांनी त्यांना प्रभागात खास स्थान मिळवून दिले आहे. संकटाच्या काळातील मदतकार्य, शैक्षणिक उपक्रम, आणि नागरिकांशी सततचा संपर्क ही त्यांची खरी ओळख आहे. प्रियांका पाटील या शिवसेना पक्षाच्या कोल्हापूर महिला शहर उपसंघटिका असून महिलांशी त्यांचा संवाद मजबूत आहे. संदीप पाटील पूर्वी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष राहिले असून त्यांचा प्रभागात व्यापक जनसंपर्क आहे.



आज प्रभाग क्रमांक 14 मध्ये समस्या मोठ्या आहेत, पण लोकांची आशा त्याहून मोठी आहे. उपलब्धता, प्रामाणिकपणा, तळमळ आणि सातत्य हे चारही गुण या कुटुंबात ठळक दिसतात. शिक्षण क्षेत्रातील अनुभवापासून ते सामाजिक व्याप्तीपर्यंत आणि प्रत्येक घटकासोबत निर्माण केलेल्या आत्मीयतेपर्यंतहे नेतृत्व प्रभागाला नवी दिशा देण्यास सक्षम आहे.

आणि म्हणूनच आज मतदारांच्या मनात एक भावना स्पष्ट दिसत आहेप्रभागाला शांत, स्वच्छ, संवेदनशील आणि अनुभवी नेतृत्व हवे आहे. एक शिक्षिका, एक मुख्याध्यापिका, एक समाजसेविका आणि आता समाजकारणासाठी सज्ज असलेले नवे नेतृत्व छाया किशोर पाटील यांचे नाव या अपेक्षांना सर्वाधिक जवळ आहे.



थोडे नवीन जरा जुने