BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

11 नोव्हेंबरला सुटणार महापालिकेचे आरक्षण

 कोल्हापूर: पुढील महापालिका निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना, आरक्षण सोडतीच्या तारखा अखेर निश्चित झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून या प्रक्रियेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 11 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षण सोडत पार पडणार आहे.


राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी संबंधित आदेश प्रसिद्ध केले आहेत. सोडतीच्या दिवशीच संबंधित अहवाल आयोगाकडे सादर करण्याची जबाबदारी प्रशासनावर असणार आहे. 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जागावाटपाची संख्या निश्‍चित करून ती आयोगाकडे सादर करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे.

तसेच, आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना यासाठी निश्चित केलेली 24 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मान्यता मिळालेली आरक्षण यादी राज्य सरकारच्या राजपत्रातून 2 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेसाठीही हाच कार्यक्रम लागू राहणार असून एकूण 20 प्रभागांतील 81 नगरसेवक पदांवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरणात या घोषणेमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

थोडे नवीन जरा जुने