BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

मेन राजाराम कॉलेजमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

कोल्हापूर : जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेबद्दलची ओळख वाढावी, भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “हिंदी है मेरे देश की बिंदी”, “हिंदी विषय का महत्व” आणि “मुंशी प्रेमचंद” या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण, सर्जनशील आणि माहितीपूर्ण निबंध लिहून हिंदी भाषेवरील आपली आस्था व्यक्त केली.


स्पर्धेचा निकाल

इयत्ता ११ वी :

प्रथम – संचिता माळवी

द्वितीय – मेहजबीन मुल्लाणी

तृतीय – प्रियांका कुरणे, रिधिमा पाल

उत्तेजनार्थ – सिद्धी माने

इयत्ता १२ वी :

प्रथम – ऋषाली कांबळे

द्वितीय – कल्याणी हिरेमठ

तृतीय – पद्मिनी उमेश गवळी

उत्तेजनार्थ – अनुष्का खोत

यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उपप्राचार्या प्रा. वनिता खडके, हिंदी विभाग प्रमुख प्रा. सुषमा पाटील, तसेच ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. अनिल लाड, प्रा. बाबासाहेब माळवे, प्रा. बाबुराव यादव, प्रा. भाऊसाहेब धराडे, प्रा. राहुल देशमुख आणि प्रा. प्रमिला मळगे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. खाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना हिंदी भाषा ही देशातील संवाद, एकात्मता आणि साहित्य यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरते नव्हे तर दैनंदिन जीवनातही हिंदी भाषेचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आत्मीयता निर्माण झाली असून, हिंदी दिवस हा केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला वाव मिळवून देणारा ठरला.

थोडे नवीन जरा जुने