BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

Periods बाबत बदलत चाललेली मानसिकता

 कधीकाळी "Periods" हा शब्द कुजबुजून बोलला जायचा. दुकानातून सॅनिटरी नॅपकिन घेताना कागदात गुंडाळून दिलं जायचं. शाळेत शिकवताना मुलींना वेगळं वर्गात नेलं जायचं, जणू काही ही लाजेची गोष्ट होती.पण आता काळ बदलतोय... आणि आपली मानसिकताही!

आज मुली उघडपणे बोलू लागल्या आहेत – हो, आम्हाला periods येतात!कारण ही लाज नव्हे – ही शरीरशास्त्रीय प्रकृती आहे.ती दुखते, त्रास देते, थकवते – पण तरीही ती रोजच्या जबाबदाऱ्या निभावत राहते.


आजच्या युगात पिरियड्सबाबत बोलणं हे taboo राहिलेलं नाही.शाळांमध्ये आता boys आणि girls दोघांना एकत्र शिकवलं जातं.काही ऑफिसेस मध्ये 'period leave' सुद्धा मिळतोय – ही मोठीच पावती आहे समजुतीची.


संजय गांधी सारख्या अनेक संस्थांनी पॅड वेंडिंग मशीन लावल्या, ग्रामीण भागात मोफत नॅपकिन्स मिळतात – याचं श्रेयही समाजातील मानसिकता बदलण्यालाच.मुलींनी आता हे दिवस लपवायचे बंद केलेत.आता ती स्वतःच्या शरीराशी, वेदनेशी, भावनांशी प्रामाणिक आहे.

Periods म्हणजे अशुद्धता नाही, ही सृष्टीची निर्मिती करणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.म्हणूनच " ती लाजतेय नाही आता, ती बोलतेय... कारण बोलणंच आहे आता तिचा सन्मान!


विशेष लेख स्नेहल तोडकर 

थोडे नवीन जरा जुने