BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

एका ट्रॅफिक पोलीसाचं खरं रूप : कर्तव्याच्या पुढचं आयुष्य..

रस्त्यावर उभा असलेला ट्रॅफिक पोलीस…कधीही आपल्या नजरेत ‘हिरो’ नसतो.आपल्याला वाटतं काय काम आहे त्याचं? सिग्नलच तर सांभाळतो!"पण आपण विसरतो  तो सिग्नल सांभाळतो, म्हणून आपलं शहर चालतं.आपली मुलं शाळेला वेळेवर पोचतात,आपण ऑफिसला पोचतो,आपण थोडा त्रास सहन केला, तरी तो प्रत्येक गोंधळ शांत करत असतो.


एका एसी ऑफिसमध्ये बसलेल्याला थोडी उष्णता जरी झाली, तरी AC चालू करतो…पण हा ट्रॅफिक पोलीस,सकाळी 8 ते संध्याकाळी 8  कधी 12-12 तास  उन्हात, पावसात, वाऱ्यात उभा असतो,पावसात सिग्नल जाम झाला तर,मोठमोठ्या गाड्या एकमेकींवर घासून जातात.लोक एकमेकांवर ओरडतात… आणि त्या गोंधळाच्या केंद्रस्थानी,एक माणूस शांतपणे ट्रॅफिक कंट्रोल करत असतो.तो म्हणजे  ट्रॅफिक पोलीस. तो ड्युटीवर असतो, पण त्याच्या डोळ्यांतून कधी काळजी दिसते,कधी थकवा आणि कधी कधी... एक हरवलेली शांतता.

कधी त्याचं मुलगं आजारी असतं,कधी बायको डॉक्टरकडे एकटी जाते…कधी वृद्ध आई घरी वाट पाहत बसते.पण हा माणूस त्या वेळी काय करतो?तो आपली काळजी बाजूला ठेवून,शेकडो अनोळखी चेहऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उभा असतो.

"तुमचं काम काय? उगाच सीटी मारत बसता!"

"काय थांबवलं मला? मी उशीर झालाय!"

"पैसे खाणारे पोलीस!"

हे शब्द ऐकूनही तो शांत राहतो.कारण त्याला माहिती आहे तो केवळ एक वर्दी नाही,तर शिस्त आणि सुरक्षिततेचा चेहरा आहे.तो काय सुपरहिरो नाही,तोही थकतो, दुखतो, कधी रडतो…पण दुसऱ्यांचं आयुष्य सुकर व्हावं म्हणून,स्वतःचं आयुष्य सिग्नलच्या कोपऱ्यावर ठेवतो.

तो एक अधिकारी असतो,पण त्याचं माणूसपण त्या उष्णतेत भिजणाऱ्या कपड्यांमध्ये,त्या थकलेल्या पावलांमध्ये आणि त्या कठोर चेहऱ्यामागच्या ओलसर डोळ्यांमध्ये दडलेलं असतं.आज जेव्हा एखादी गाडी वेगात धावते आणि सिग्नल मोडते,तेव्हा तो पोलिस तिला थांबवतो  रागानं नव्हे, तर काळजीपोटी.

कारण त्याला माहिती आहे ,एक चुकीचा वळण अनेकांचे जीव घेऊ शकतो.आपण त्याला पाहतो त्याच्या सीटीकडे, त्याच्या हातवाऱ्याकडे…पण पाहिजे त्याच्या हृदयाकडे!

हा लेख लिहिण्याचं कारण एकच ,तो फक्त सिग्नलचा माणूस नाही. तो माणूस आहे!"आपल्या कर्तव्यासाठी आपल्या घरचं आयुष्य मागं ठेवणारा…आणि म्हणूनच तो,खरा_हिरो आहे.

तो रस्त्यावर उभा असतो…पण घरातली काळजी सोबत घेऊन!

आदर द्या त्याला  कारण तो आपल्यासाठी स्वतःचं सर्वस्व झिजवतो.


विशेष लेख स्नेहल तोडकर 

थोडे नवीन जरा जुने