NK NEWS MARATHI
विश्वासार्ह • वेगवान • निष्पक्ष
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘युवासेना हेल्पलाईन’ फलकाचे अनावरण
कोल्हापूर, प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. १ ऑगस्ट २०२६) शासकीय विश्रामगृह येथे "युवासेना हेल्पलाईन" या उपक्रमाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना विविध अडचणी व शासकीय कामकाजाबाबत मार्गदर्शन आणि मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर
शिवसेना जिल्हाप्रमुख विराज पाटील, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख सुरेश पवार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नगरसेविका प्रतिज्ञा उत्तरे, शिवसेना शहरप्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंजीत माने, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, शिवदूत सुनील जोशी, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख स्मिताताई सावंत, महिला शहरप्रमुख रीमा देशपांडे, अनिता ठोंबरे, दीपा शिंदे, युवासेना जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, शहर समन्वयक कीर्तीकुमार जाधव, शुभम पाटील, शहर चिटणीस अभि दाभाडे, तालुकाप्रमुख संकेत गुरव, उपशहरप्रमुख अक्षय मोरे, चिन्मय बोकील, ऋषिकेश जोशी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवासेनेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी ‘युवासेना हेल्पलाईन’ उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना शहर समन्वयक रोहित सुहास (राजू) वेढे यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
