BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

योग्य आहार, व्यायाम व झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री

सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री - डॉ. सत्यनारायण चावा यांचे प्रतिपादन
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ

*योग्य आहार, व्यायाम व झोप*
*ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री*

‘लॉरस लॅब’ चे संस्थापक डॉ. सत्यनारायण चावा यांचे प्रतिपादन

कोल्हापूर: योग्य आहार, नियमित व्यायाम व पुरेशी झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री असल्याचे प्रतिपादन लॉरस लॅब चे संस्थापक व मुख्य कार्यवाही अधिकारी डॉ. सत्यनारायण चावा यांनी केले. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या वतीने आयोजित 'भारतीय आरोग्य यंत्रणेतील संधी आणि आव्हाने' त्याचबरोबर 'हेल्दी एजिंग' (सुदृढ वृद्धत्व) या विषयावर डॉ. चावा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आरोग्यमय दीर्घायुष्याची त्रिसूत्री

१. योग्य आहार

शरीराला आवश्यक पोषक घटक देणारा संतुलित आहार.

२. नियमित व्यायाम

शारीरिक क्षमता आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी दैनंदिन व्यायाम.

३. पुरेशी झोप

मानसिक शांतता आणि शरीराच्या पुनर्निर्माणासाठी आवश्यक विश्रांती.

आरोग्य क्षेत्रातील आव्हाने आणि विकसित भारताचे स्वप्न

डॉ. चावा आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, सध्या भारतीय नागरिकांचे सरासरी आयुष्यमान वाढत आहे, परंतु दुसरीकडे जन्मदर घटत आहे. हे आरोग्य क्षेत्रातील भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडची संख्या कमी आहे. २०४७ मध्ये विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आरोग्य क्षेत्र, शिक्षण आणि संशोधन यावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे.

हेल्थ केअर आणि मेडिकल टुरिझम

हेल्थ केअर क्षेत्र झपाट्याने वाढत असून मेडिकल टुरिझमलाही मोठी संधी उपलब्ध आहे. भविष्यात आरोग्य क्षेत्रात खालील मोठे बदल होणार असून तंत्रज्ञानाचा वापर वाढून मानवी आरोग्य आणि जीवन अधिक सुलभ होईल:

    वेअरेबल डिव्हाईस (Wearable Devices) चा वापर ई-कन्सल्टन्सी (E-Consultancy) ची सोय प्रगत आरोग्य तंत्रज्ञान आत्मसात करणे विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या वाढत्या संधी

‘हेल्थी एजिंग’ (सुदृढ वृद्धत्व)

‘हेल्थी एजिंग’वर बोलताना त्यांनी वय का वाढते, शरीरात काय बदल होतात आणि त्याचे बायोलॉजिकल बदल आदींविषयी सविस्तर शास्त्रीय माहिती दिली. "एजिंग हा आजार असून त्यावर कोणतेही औषध नाही. व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हीच आरोग्यमय दीर्घायुष्याची त्रिसूत्री आहे," असा मोलाचा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

व्यासपीठावरील प्रमुख उपस्थिती

डॉ. चावा यांचे स्वागत कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर:

कुलपती
डॉ. संजय डी. पाटील
प्र-कुलपती (डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ)
ऋतुराज संजय पाटील
कुलगुरू (डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ)
डॉ. राकेश कुमार शर्मा
कुलगुरू (डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ)
डॉ. ए. के. गुप्ता

उपस्थित सन्माननीय मंडळी

या कार्यक्रमाला विद्यापीठाचे विविध पदाधिकारी, विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते:

  • डॉ. व्ही. व्ही. भोसले
    कुलसचिव, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ
  • अभय जोशी
    परीक्षा नियंत्रक
  • डॉ. शिंपा शर्मा
    आय क्यू ए सी (IQAC) डायरेक्टर
  • डॉ. राजेश ख्यालप्पा
    मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता
  • डॉ. वैशाली गायकवाड
    वैद्यकीय अधीक्षक
  • डॉ. सी डी लोखंडे
  • डॉ. अमृतकुंवर रायजादे
  • डॉ. अजित पाटील
  • डॉ. अभिनंदन पाटील
  • डॉ. अर्पिता तिवारी

सह विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग.

© 2026 NewssKatta. सर्व हक्क सुरक्षित. | आरोग्य आणि शैक्षणिक घडामोडींचा डिजिटल पार्टनर

थोडे नवीन जरा जुने