BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

भीमा कोरेगाव दंगलीतील प्रकरणांचा १५ ऑगस्टपर्यंत अहवाल; पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

भीमा कोरेगाव दंगलीतील प्रकरणांचा अहवाल
विशेष बातमी

भीमा कोरेगाव दंगलीतील प्रकरणांचा १५ ऑगस्टपर्यंत अहवाल; पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

कोल्हापूर | प्रतिनिधी

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणानंतर कोल्हापूर जिल्ह्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा सविस्तर अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. दंगलीनंतर आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची सद्यस्थिती, त्यातील स्थानिक पातळीवरील गुन्हे, तसेच ते मागे घेण्यासंदर्भातील प्रक्रिया याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी संबंधित पोलिस अधिकारी आणि स्थानिक समित्यांनी गुन्ह्यांचे वस्तुनिष्ठ परीक्षण करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा, असे निर्देश दिले. हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस उपस्थित अधिकारी व मान्यवर:
डॉ. विजय राठोड (जिल्हाधिकारी) गजानन गुरव (उपजिल्हाधिकारी) मौसमी चौगुले (प्रांताधिकारी) प्रसाद चौगुले (प्रांताधिकारी) विविध विभागांचे अधिकारी स्थानिक कार्यकर्ते

२०१८ मध्ये भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही विविध ठिकाणी आंदोलन झाले होते. त्यावेळी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या प्रकरणांचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीसाठी हा अहवाल तयार करण्यात येत आहे.

थोडे नवीन जरा जुने