BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

ताराबाई पार्क मधील उदय शिंदे यांच्या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी अखेर महापालिकेची नोटीस

ताराबाई पार्क बेकायदेशीर बांधकाम प्रकरण - News कट्टा
NEWS कट्टा इम्पॅक्ट

ताराबाई पार्क मधील उदय शिंदे यांच्या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी अखेर महापालिकेची नोटीस...

कोल्हापूर | महानगरपालिकेची मोठी कारवाई

कोल्हापूर : ताराबाई पार्क परिसरातील सामाईक मिळकतीमध्ये सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर कंपाउंड बांधकाम प्रकरणी अखेर कोल्हापूर महानगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात News कट्टाने सातत्याने बातम्यांमधून मुद्दा उचलला होता, तर नगरसेविका दिपाली राजेश घाटगे यांनी थेट महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली होती.


नगरसेविका दिपाली घाटगे यांचा आरोप

नगरसेविका दिपाली घाटगे यांनी दिलेल्या निवेदनात, ताराबाई पार्क परिसरातील सामाईक जागेत आवश्यक परवानगी न घेता बेकायदेशीर कंपाउंड बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. नगररचना विभागाकडून कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसतानाही काही अधिकारी व अभियंत्यांच्या संगनमताने काम सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता.

संमतीशिवाय अनधिकृत बांधकाम

या प्रकरणात राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सिद्धार्थ शिंदे व त्यांचे वडील उदय शिंदे यांनी संबंधित अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला होता. तसेच, इतर जागामालकांची संमती न घेताच हे बांधकाम करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता. भविष्यात वाद निर्माण होऊ नयेत यासाठी जागेची संयुक्त पाहणी करून तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी घाटगे यांनी केली होती.

महापालिकेची नोटीस!

दरम्यान, या प्रकरणी आता कोल्हापूर महानगरपालिकेकडून उदय शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

  • १५ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश.
  • सुनावणी: २४ जून २०२६ | दुपारी ३.३० वाजता
  • ठिकाण: नगररचना विभाग

कडक कारवाईचा इशारा

निर्धारित मुदतीत समाधानकारक खुलासा न केल्यास संबंधित बांधकामावर पाडकामासह पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.

© 2026 News कट्टा. सर्व हक्क राखीव.

थोडे नवीन जरा जुने