BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

शक्तीपीठ महामार्गविरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

शक्तीपीठ महामार्गविरोधात विराट मोर्चा
महामोर्चा विशेष कोल्हापूर, दि. ८

शक्तीपीठ महामार्गविरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा


शेतकऱ्यांना भूमिहीन करून देशोधडीला लावणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी (दि. ९) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोर्चाची वेळ आणि मार्ग:

  • वेळ: सकाळी ११ वाजता
  • सुरुवात: दसरा चौकातून सुरू होणार
  • मार्ग: दसरा चौक ते डिक्स कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार.

या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

मोर्चामधील प्रमुख उपस्थिती व मान्यवर:

खासदार शाहू छत्रपती काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी आमदार जयंत आसगावकर माजी आमदार के. पी. पाटील संजय पवार विजय देवणे रविकिरण इंगवले

यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटना, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व बाधित शेतकरी सहभागी होणार असल्याचे संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे आणि प्रकाश पाटील यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने