शाहू विजयी गंगावेस तालीमचे रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
ऐतिहासिक वारसा आणि महत्त्व
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केलेली ही तालीम राज्यातील नामवंत आणि दर्जेदार पैलवान घडविणारी तालीम म्हणून ओळखली जाते. कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाचे स्थान असलेल्या या ऐतिहासिक तालीममध्ये सध्या विविध अडचणी आणि गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मंडळाच्या म्हणण्यानुसार, २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तालीमला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर शासनाच्या अर्थसंकल्पातून सुमारे २ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून काही कामे पूर्ण झाली असली तरी पैलवानांसाठी निवासी इमारत आणि सरावासाठी आवश्यक असलेले बांधकाम अद्याप अपूर्ण आहे.
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे गरजेचे!
यामुळे पैलवानांच्या राहण्याची तसेच नियमित सरावाची मोठी गैरसोय होत असून, पावसाळा सुरू झाल्यानंतर ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच सुरू असलेल्या बांधकामात काही प्रशासकीय अडथळे आणि अतिक्रमणाच्या समस्या असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित शासकीय यंत्रणांना आवश्यक सूचना देऊन रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करावे, तसेच पैलवानांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. हे निवेदन तालीम मंडळाचे अध्यक्ष दीपक जयराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित पदाधिकारी:
शाहू विजयी गंगावेस तालीमचे रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करून पैलवानांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली:
