BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

शाहूपुरी पोलीस ठाण्यात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

शाहूपुरी पोलीस ठाण्यात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
जागतिक तंबाखू विरोधी दिन पार्श्वभूमी

शाहूपुरी पोलीस ठाण्यात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सीपीआर रुग्णालय व सेवा रुग्णालय उपक्रम

कोल्हापूर, दि. २२: ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सीपीआर रुग्णालय व सेवा रुग्णालय कसबा बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व कायदेशीर अंमलबजावणी :

जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तंबाखू सेवनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि कर्करोगासारखे गंभीर आजार याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच कोटपा ॲक्ट (COTPA Act 2003) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य व पोलीस विभागांनी संयुक्तपणे कार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

मौखिक आरोग्याची काळजी :

दंत चिकित्सक डॉ. अर्चना पाटील यांनी मौखिक आरोग्याविषयी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमित दंत व मौखिक तपासणी करण्याचे आवाहन केले.

या विशेष आयोजित करण्यात आलेल्या मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ शाहूपुरी पोलीस ठाण्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेऊन स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली.

मार्गदर्शन व नेतृत्व

  • डॉ. सरिता थोरात
    जिल्हा शल्य चिकित्सक (प्रभारी) व निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य)
  • संतोष डोके
    पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे
  • डॉ. व्ही. ए. आरळेकर
    जिल्हा सल्लागार (NTCP)
  • डॉ. अर्चना पाटील
    दंत शल्य चिकित्सक
संयुक्त विद्यमान उपक्रम

आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांचा सामाजिक आरोग्यासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी एक कौतुकास्पद पुढाकार.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP)

सीपीआर रुग्णालय व सेवा रुग्णालय कसबा बावडा, कोल्हापूर

© २०२६ सर्व हक्क सुरक्षित. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन

थोडे नवीन जरा जुने