BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

शहरातील नालेसफाईची जिल्हाधिकारी व आयुक्तांकडून पाहणी

शहरातील नालेसफाईची जिल्हाधिकारी व आयुक्तांकडून पाहणी
कोल्हापूर, ता. २०

शहरातील नालेसफाईची जिल्हाधिकारी व आयुक्तांकडून पाहणी

महानगरपालिकेमार्फत शहरात पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची आज जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सकाळी ८ वाजता व्हिनस कॉर्नर येथील गाडी अड्डा परिसरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी करून चालू असलेल्या कामाची माहिती घेतली.

आयुक्तांचे महत्त्वाचे निर्देश:

  • नाल्यातील गाळ पूर्णपणे बाहेर काढून तो तात्काळ अन्यत्र हलवावा.
  • शहरातील सर्व नालेसफाईची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना देण्यात आले.
  • जेसीबी आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

गाडी अड्डा येथील ‘पे अँड पार्क’ सुविधेचा पूर्ण क्षमतेने वापर होईल, अशा पद्धतीने योग्य नियोजन करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. त्यानंतर हुतात्मा गार्डन व प्रतिभानगर परिसरातील सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी करण्यात आली. प्रतिभानगर येथे ‘लाँग बूम’ यंत्राद्वारे सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.


यावेळी उपस्थित अधिकारी व लोकप्रतिनिधी:
अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ नगरसेवक अमर समर्थ विनायक फाळके उपआयुक्त परितोष कंकाळ सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे

© २०२६ कोल्हापूर महानगरपालिका वृत्त सेवा. सर्व हक्क राखीव.

थोडे नवीन जरा जुने