महानगरपालिका घरफाळा विभागाच्या वतीने सहा दिवसांत २९९ मिळकतींचा शोध
कोल्हापूर, ता. ७ मे २०२६
कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाने शहरातील करआकारणी न झालेल्या तसेच नियमबाह्य बदल झालेल्या मिळकतींवर विशेष मोहीम हाती घेतली असून, अवघ्या सहा दिवसांत तब्बल २९९ मिळकतींचा शोध लावला आहे.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार १ ते ३० मे २०२६ या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांमार्फत लिपिकनिहाय भाग निश्चित करून ही शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
मोहिमेतील आतापर्यंतची महत्त्वाची आकडेवारी:
२०४ करआकारणी न झालेल्या मिळकती
६६ भाडेकरू वापर असलेल्या मिळकती
२९ क्षेत्रवाढ झालेल्या मिळकती
महापालिकेकडून आता या मिळकतींची अंतिम करआकारणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मिळकतधारकांकडून खालील कागदपत्रे मागविण्यात आली आहेत:
- • बांधकाम परवानगी
- • भोगवटा प्रमाणपत्र
- • भाडेकरारपत्र
- • नगररचना विभागाची क्षेत्रवाढीची परवानगी
मिळकतधारकांनी तातडीने जवळच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा - आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड