BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वी जयंती विशेष

मोगरा फुलला - सांगीतिक कार्यक्रम

कोल्हापुरात रंगणार संत ज्ञानेश्वरांच्या
जीवनप्रवासाचा सोहळा

‘मोगरा फुलला’ - एक विशेष सांगीतिक मेजवानी

दिनांक

सोमवार, २७ एप्रिल २०२६

वेळ

सायंकाळी ६ वाजता

स्थळ

गोविंदराव टेंबे सभागृह, देवळ क्लब, कोल्हापूर

प्रवेश

विनामूल्य

भक्ती आणि संगीताचा सुरेल संगम

“ज्ञानीयांचा राजा मोगरा फुलला” हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकिक जीवनचरित्रावर आधारित आहे.

निरूपण: गणेश शिंदे (माऊलींच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग)

गायन: सन्मिता शिंदे (सुप्रसिद्ध गायिका)

अभंग, भजन, गवळण आणि भारूड यांच्या माध्यमातून भक्तीचा मोगरा रसिकांच्या मनात दरवळणार आहे.

आयोजनामागचा उद्देश

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे. संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि त्यांचे कार्य केवळ ग्रंथांपुरते मर्यादित न राहता ते नव्या पिढीपर्यंत, विशेषतः तरुणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे, हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे.

या भक्तिरसाचा आनंद घेण्यासाठी नक्की या!

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी कोल्हापूर परिसरातील सर्व रसिक श्रोत्यांना आणि भाविकांना या सांगीतिक मेजवानीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसाचा आनंद घ्यावा.

आयोजक: सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन

© २०२६ | सर्व हक्क राखीव

थोडे नवीन जरा जुने