BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

सीपीआर रुग्णालय दुरुस्ती कामे

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

कोल्हापूर, दि. ७ एप्रिल २०२६


राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची कामे, सर्व इमारतींचे अंतर्बाह्य सुशोभीकरण तसेच अनुषंगिक दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.

या कामांच्या दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दि. ७ एप्रिल २०२६ पासून रुग्णालयाच्या मुख्य कमानीचे काम सुरू करण्यात येणार असल्याने गोदावरी इमारतीजवळील प्रवेशद्वार तात्पुरते बंद करण्यात येत आहे.

गोदावरी गेटचे काम पूर्ण होईपर्यंत अपघात विभागासमोरील गेट रुग्णालयात प्रवेशासाठी खुले ठेवण्यात येणार असून, बाहेर जाण्यासाठी कुंभी गेटचा वापर करण्यात येणार आहे.

या कालावधीत रुग्णसेवेमध्ये कोणताही निष्काळजीपणा होणार नाही, याची प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी दिली.

थोडे नवीन जरा जुने