‘कोरोना साथीनंतर जनसंपर्क क्षेत्र अधिक महत्वाचे झाले आहे पण विश्वासार्हता टिकवणे हे महत्वाचे आहे. तसेच एआय टूलच्या वापरामुळे कामास गती मिळते मात्र आपत्कालीन स्थितीतही सत्य आणि नैतिकता जणे आवश्यक आहे, असे मत विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी ‘पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचे’ अधिकृत उदघाटन झाल्याचे जाहीर केले.
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाच्या सभागृहात आयोजित पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय)च्या कोल्हापूर चॅप्टर उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्ष प्रा. डॉ. निशा मुडे-पवार, सचिव विश्वजीत भोसले, कोषाध्यक्ष सचिन मोरे उपस्थित होते.
एआय आणि रोजगाराच्या संधी
- डॉ. रवींद्र चिंचोलकर
प्रशासनाची भूमिका आणि 'गोल्डन अवर'
अंकुश चव्हाण म्हणाले, ‘आपत्कालीन स्थितीत पहिले काही तास 'गोल्डन अवर' म्हणून महत्वाचे असतात. यंत्रणेने नेमके काय चुकले ते शोधून दुरुस्ती करणे गरजेचे असते. घटना घडल्यानंतर माध्यमांना तत्काळ योग्य माहिती दिल्यास नंतर खुलासा करण्याची गरज पडत नाही.’
विशेष सत्कार आणि मान्यवरांची उपस्थिती
यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे माजी विद्यार्थी व भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, पी. एस. पाटील (माझगाव डॉक), सचिन अडसूळ (जिल्हा माहिती अधिकारी), वृषाली पाटील (माहिती अधिकारी), माधव जायभाई (आकाशवाणी), मोहन सूर्यवंशी (मपा जनसंपर्क अधिकारी), डॉ. राजेंद्र पारिजात, डॉ. दशरथ पारेकर, डॉ. वृषाली बर्गे, विवेक सिद्ध, सचिन मोरे, सरदार जाधव, विवेक पोर्लेकर, दिग्विजय कुंभार, रोहिणी साळुंखे, सुनील भस्मे आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुराधा ईनामदार व डॉ. चंद्रशेखर वानखेडे यांनी केले. कार्यक्रमास कार्यकारणी सदस्य, जनसंपर्क, जाहिरात, विविध माध्यम क्षेत्रात कार्यरत व्यक्ती तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सदर आयोजन पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टर आणि पत्रकारिता विभाग, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
