BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

कोल्हापूर : KIT कॉलेजच्या विभागप्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा; ४ ते ५ विद्यार्थिनींशी अश्लील वर्तनाचा आरोप

कोल्हापूर (प्रतिनिधी):

येथील नामांकित 'केआयटी' (KIT) कॉलेजमधील सिव्हिल एनवायरमेंट विभागाचे विभागप्रमुख (HOD) सौरभ जोशी यांच्यावर विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीला वैयक्तिक कामासाठी केबिनमध्ये बोलावले होते. यावेळी त्यांनी तिच्याशी अश्लील आणि अनुचित वर्तन केले. या धक्क्यातून सावरल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने हिंमत दाखवत ही बाब उघड केली. तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित प्राध्यापकाने आतापर्यंत ४ ते ५ विद्यार्थिनींशी अशाच प्रकारचे वर्तन केल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. गोकुळ शिरगाव पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून प्राध्यापक सौरभ जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून अन्य कोणा विद्यार्थिनीसोबत असा प्रकार घडला आहे का, यादृष्टीनेही पोलीस चौकशी करत आहेत.

थोडे नवीन जरा जुने