BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

नाशिक: भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

नाशिक: भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक | NewsKattaa

NewsKattaa - सत्य बातमी, थेट वारी

क्राईम रिपोर्ट | नाशिक

नाशिकमध्ये खळबळ: हायप्रोफाईल भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक; २८ मार्चपर्यंत कोठडी

प्रसिद्धी: १९ मार्च २०२६ | प्रतिनिधी, न्यूजकट्टा

अशोक खरात अटक बातमी

नाशिक: स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून आणि भविष्याचा वेध घेण्याचे आमिष दाखवून महिलांचे शोषण करणाऱ्या एका हायप्रोफाईल भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला आहे. नाशिक पोलिसांनी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली असून, न्यायालयाने त्याला २८ मार्चपर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरात याने मंत्र-तंत्राच्या नावाखाली संमोहन करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

अशोक खरात हा मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर ज्योतिषी म्हणून व्यवसाय करत होता. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०२२ पासून हा अत्याचाराचा प्रकार सुरू होता. खरातने तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

५८ व्हिडिओ असलेले पेनड्राईव्ह पोलिसांच्या हाती

तपासादरम्यान पोलिसांना एक पेनड्राईव्ह सापडला असून, त्यामध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओंचा सखोल तपास तांत्रिक विश्लेषण शाखेमार्फत सुरू आहे.

राजकीय पडसाद आणि चर्चा

या अटकेनंतर सोशल मीडियावर आरोपी अशोक खरात याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासोबतचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. चाकणकर यांनी "पोलिस तपासावर माझा पूर्ण विश्वास असून दोषीला कडक शासन होईल," असे स्पष्ट केले आहे.

थोडे नवीन जरा जुने