BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

अजितदादा पवार यांचे स्मारक केएसबीपी चौकात होणार; हसन मुश्रीफ यांच्याकडून जागा निश्चित

कोल्हापूर: अजितदादा पवार यांचे स्मारक केएसबीपी चौकात होणार; हसन मुश्रीफ यांच्याकडून जागा निश्चित

विद्यापीठाजवळील केएसबीपी चौकात होणार अजितदादा पवार यांचे स्मारक; हसन मुश्रीफ यांच्या पाहणीनंतर जागा निश्चित

कोल्हापूर | प्रतिनिधी तारीख: १९ मार्च २०२६

कोल्हापूर: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी विद्यापीठाजवळील केएसबीपी चौकातील महापालिकेची जागा गुरुवारी अंतिम करण्यात आली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक व महापौर रुपाराणी निकम यांच्या पाहणीनंतर या जागेवर शिक्कमोर्तब करण्यात आले.

  • निश्चित जागा: केएसबीपी चौक (विद्यापीठ परिसर), कोल्हापूर
  • आर्किटेक्ट: सुनील पाटील (स्मारकाचा प्लॅन तयार करणार)

स्व. अजितदादा पवार यांचे कोल्हापूरसाठी मोठे योगदान असून त्यांचे स्मारक होण्यासाठीचा ठराव पहिल्याच सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. विद्यापीठाजवळील केएसबीपी चौकातील महापालिकेची अर्धा एकरापेक्षा जास्त जागा या कामासाठी निवडण्यात आली आहे. मुख्य चौकात आणि दर्शनी भागात ही जागा असल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांनी या जागेला तत्काळ हिरवा कंदील दर्शविला.

"अजितदादा पवार यांचे कोल्हापूरशी घट्ट ऋणानुबंध राहिले आहेत. थेट पाईपलाईन, आयटी पार्क, शासकीय महाविद्यालय अशा अनेक प्रकल्पांसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. योगायोगाने या जागेवर त्यांचा पदस्पर्शही झाला आहे."
हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी सांगितले की, "विमानतळावर येताना पहिल्यांदा दर्शनी भागात अजितदादा पवार यांचा पुतळा दिसेल. महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापुरात इतका दर्जेदार पुतळा आणि स्मारक उभारले जाईल." महापौर रूपाराणी निकम यांनीही ही जागा स्मारकासाठी अत्यंत योग्य असल्याचे स्पष्ट केले.

उपस्थित मान्यवर: उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, गटनेता मुरलीधर जाधव, आदिल फरास, नगरसेवक विजय जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


© न्यूजकट्टा (NewsKattaa) | सर्व हक्क राखीव

थोडे नवीन जरा जुने