BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

पाटाकडील तालीम मंडळ 'राजेश चषक'चे मानकरी; अंतिम सामन्यात शिवाजी तरुण मंडळावर मात

कोल्हापूर:

येथील प्रतिष्ठित 'राजेश चषक फुटबॉल स्पर्धा २०२६' वर पाटाकडील तालीम मंडळाने (पीटीएम) आपले नाव कोरले. शनिवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात पाटाकडीलने श्री शिवाजी तरुण मंडळाचा २-१ असा पराभव करत विजेतेपद पटकावले.


सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. खेळाच्या ३२ व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या करण बंद्रे याने गोल नोंदवून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, पाटाकडीलच्या अरबाज पेंढारी याने ३९ व्या मिनिटाला गोल करत सामना १-१ अशा बरोबरीत आणला. उत्तरार्धात ५२ व्या मिनिटाला ओमकार मोरे याने गोल करत पाटाकडीलला २-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

विजेत्या पाटाकडील संघाकडून अमीन काझीर, ऋषिकेश मेथे पाटील, यशराज कांबळे, रोमारियो, ओमकार मोरे आणि नबी खान यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर शिवाजी तरुण मंडळाकडून संकेत नितीन साळोखे, दर्शन पाटील, करण बंद्रे, हर्ष जरग, योगेश कदम आणि संकेत जरग यांनी कडवी झुंज दिली.

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके:

सामनावीर: ओमकार मोरे (पीटीएम)

मालिकावीर: ऋषिकेश मेथे पाटील (पीटीएम)

उत्कृष्ट फॉरवर्ड: संकेत नितीन साळोखे (शिवाजी तरुण मंडळ)

उत्कृष्ट हाफ: दर्शन पाटील (शिवाजी तरुण मंडळ)

उत्कृष्ट डिफेन्स: प्रतीक बदामे (पीटीएम)

उत्कृष्ट गोलकीपर: अमर गवळी (पीटीएम)

बक्षीस वितरण समारंभास खासदार शाहू महाराज, आमदार राजेश क्षीरसागर, उपमहापौर अक्षय जरग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने