BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

कोल्हापूर महानगरपालिका: स्थायी व परिवहन समिती सदस्यांची निवड; स्वीकृत नगरसेवकांची नावेही निश्चित

 कोल्हापूर: प्रतिनिधी

कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. यासोबतच रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदांसाठीही पक्षांनी अनुभवी कार्यकर्त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.



महानगरपालिकेच्या तिजोरीवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्थायी समितीवर काँग्रेसने सर्वाधिक ७ सदस्यांची वर्णी लावली आहे. यामध्ये इंद्रजीत बोंद्रे, प्रवीण केसरकर, प्रताप जाधव, अमर समर्थ, सुभाष बुचडे, प्रवीण सोनवणे आणि प्रतिज्ञा उत्तरे यांचा समावेश आहे. भाजपकडून विशाल शिराळे, राजनंदा महाडिक, नेहा तेंडुलकर, अभिजीत मोकाशी आणि पूर्वा राणे या ५ सदस्यांची निवड करण्यात आली आहे, तर शिवसेनेकडून अर्चना पागर, अनुराधा खेडकर आणि शीला सोनुले या ३ महिला सदस्यांना संधी देण्यात आली आहे.

शहराच्या सार्वजनिक वाहतुकीची जबाबदारी असलेल्या परिवहन समितीमध्ये काँग्रेसतर्फे दुर्वास कदम, उमेश पोवार, महेंद्र कोरडे व श्रीधर गाडगीळ यांची निवड झाली आहे. भाजपतर्फे प्रसाद जाधव, हेमंत आराध्ये, संतोष लाड आणि प्रशांत मोरे यांना संधी मिळाली आहे. शिवसेनेकडून सत्यजित जाधव व रोहन अतिग्रे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मानसी लोळगे यांची निवड झाली आहे.

याशिवाय, प्रशासकीय आणि राजकीय अनुभवाचा फायदा मिळवण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसने सुनील मोदी, मुस्ताक मलबारी आणि राहुल माने यांची निवड केली आहे. भाजपने प्रा. जयंत पाटील, विजय जाधव आणि सुनील वाडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे, तर शिवसेनेकडून रत्नेश शिरोळकर आणि प्रसाद चव्हाण यांची वर्णी लागली आहे.

या नवीन नियुक्त्यांमुळे महापालिकेच्या कामकाजाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार असून, आगामी काळात शहराच्या विकासकामांवर या समित्यांचा मोठा प्रभाव राहणार आहे.

थोडे नवीन जरा जुने