BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित; सतेज पाटलांकडून शब्दाची पूर्तता

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसने आपल्या तीन स्वीकृत नगरसेवकांची नावे अखेर निश्चित केली आहेत आमदार सतेज पाटील यांनी दिलेला शब्द पाळत अनुभवी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना ही संधी दिली आहे 



काँग्रेसचे नवे स्वीकृत नगरसेवक: काँग्रेसने सुनील मोदी, मुस्ताक मलबारी आणि राहुल माने या तिघांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे 

• सुनील मोदी: शिवसेनेचे माजी शहर प्रमुख असलेल्या मोदी यांनी निवडणुकीत माघार घेतली होती आमदार सतेज पाटील यांनी त्यांना शब्द दिला होता, त्यानुसार त्यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे 

• मुस्ताक मलबारी: त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन काँग्रेसच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले होते, त्याचे बक्षीस म्हणून त्यांना ही संधी मिळाली आहे 

• राहुल माने: प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांचा पराभव झाला असला तरी, शारंगदर देशमुख यांच्या विरोधात त्यांनी दाखवलेले धाडस आणि दिलेली कडवी झुंज विचारात घेऊन आमदार सतेज पाटील यांनी त्यांची निवड केली आहे 

इतर पक्षांची स्थिती: भारतीय जनता पक्षाने (भाजप) आधीच आपली तीन नावे निश्चित केली असून, यामध्ये प्राध्यापक जयंत पाटील, सुनील वाडकर आणि विजय जाधव यांचा समावेश आहे 

दुसरीकडे, शिवसेनेच्या नावाबाबत अद्याप चर्चा सुरू आहे  रत्नेश शिरोळकर, प्रसाद चव्हाण आणि इंद्रजीत अडगुळे ही तीन नावे चर्चेत असून, यापैकी शिरोळकर आणि प्रसाद चव्हाण यांची नावे निश्चित होण्याची दाट शक्यता आहे 

कोल्हापूरच्या राजकारणात आता या नियुक्त्यांमुळे आगामी काळात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात

थोडे नवीन जरा जुने