BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

अन.. अचानक मध्यरात्री आमदार क्षीरसागर यांच्याकडून रस्त्याच्या कामाची पाहणी

कोल्हापूर  : कोल्हापुरातील रस्त्यांवरून गेले काही दिवस नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. निधी मंजूर करण्याचे काम लोकप्रतिनिधींचे पण.. रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे काम महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे.. असे असताना पालकमंत्री, आमदार, खासदार शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर आक्रमक भूमिके घेत असल्याचे पहायला मिळत असतानाही महापालिका अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य आहे कि नाही असा सवाल नागरीकांमधून व्यक्त केला जात आहे. पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिकेत आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत रस्त्यांची गुणवत्ता, दर्जा योग्य असण्यासाठी रस्त्यांचे काम सुरु असताना जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित असणे अनिवार्य आहे, अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार शहरात प्रमुख रस्त्यांच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. काल मध्यरात्री अचानक आमदार राजेश क्षीरसागर यांनी दसरा चौक ते स्वयंभू गणेश मंदिर लक्ष्मीपुरी या सुरु असलेल्या रस्त्याच्या कामास भेट दिली. पण दिलेल्या सुचनेनुसार अधिकारी आणि प्रमुख ठेकेदार या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निदर्शनास आल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी तात्काळ संबधित अधिकारी आणि ठेकेदाराशी संपर्क साधून खडे बोल सुनावले.


 शहरातील रस्त्यांचा दर्जा टिकविण्याची जबाबदारी प्रशासन आणि ठेकेदाराची असल्याचे सांगत त्यांनी यापुढे रस्त्यांच्या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घ्यावे, अशा सक्त सूचना यावेळी दिल्या. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या या अचानक भेटीची चर्चा सकाळपासून शहरात सुरु असून आमदार क्षीरसागर यांच्या कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.



थोडे नवीन जरा जुने