BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

उपनियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयात महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जनता दरबार

 कोल्हापूर : वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता वाढविणे, लोकसंपर्क दृढ करणे आणि ग्राहक तक्रारींचे वेळेवर निराकरण करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी दुपारी 2 वाजता उपनियंत्रक वैध मापन शास्त्र, कोल्हापूर जिल्हा यांचे कार्यालय (1875 सी, वॉर्ड, हत्तीमहल रोड, मटन मार्केट शेजारी, कोल्हापूर-416 002) येथे जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे. वैधमापन शास्त्र अधिनियम व वैधमापन शास्त्र आवेष्टीत वस्तू कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जनता व ग्राहक यांच्या तक्रारी असल्यास त्या या ठिकाणी मांडता येणार आहेत. यंत्रणेच्या कामकाजाविषयी व वजने मापे संदर्भात फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध तक्रारी असल्यास त्यासह संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक द.प्र.पवार यांनी केले आहे.


या जनता दरबारमध्ये माहितीचा प्रचार व जनजागृती, हितधारकांचा सहभाग, तक्रारींची नोंद व कार्यवाही अशा विविध गोष्टींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सामान्य ग्राहक, ग्राहक संघटना, पॅकबंद वस्तूंचे उत्पादक, पॅकर, आयातदार, किरकोळ विक्रेते व व्यापारी, वजन व मापे परवानाधारक उत्पादक, दुरुस्तक व विक्रेते यांनी उपस्थित राहून यंत्रणेच्या कामकाजाविषयी आपल्या सुचना, अभिप्राय द्यावेत, असे आवाहनही पवार यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

थोडे नवीन जरा जुने