BREAKING
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 35 हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा. 🔴 किणी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीचे उपाय. 🔴 राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. 🔴 संत बाळूमामा देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. 🔴 अंबाबाई मंदिराला संरक्षित प्राचीन स्मारक दर्जाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. 🔴 कोल्हापूरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा. 🔴 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; दुरुस्तीची मागणी. 🔴 घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन सतर्क. 🔴 पर्यटनस्थळांवर सुट्टीमुळे पर्यटकांची वाढती गर्दी. 🔴 2.36 कोटींच्या 'बॉस स्कॅम' प्रकरणातील तपासाला वेग. 🔴
]]>

तिरंगा आमच्या शेतात – शक्तीपीठ नको वावरात” : १५ ऑगस्टला बारा जिल्ह्यात शेतकरी उठाव

कोल्हापूर प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात शेतकरी आता स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी एक वेगळाच हल्ला चढवणार आहेत. “तिरंगा झळकतोय आमच्या शेतात – शक्तीपीठ नको आमच्या वावरात” या घोषणेसह राज्यातील बारा जिल्ह्यांमधील ज्या शेतातून हा महामार्ग जाणार आहे, त्या शेतातच १५ ऑगस्टला तिरंगा फडकावला जाणार आहे.


हा निर्णय शनिवारी आयोजित शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला. खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार अमित देशमुख, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत, आमदार कैलास पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह बाराही जिल्ह्यांतील शेतकरी व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


बैठकीत ग्रामसभांमधून शक्तीपीठविरोधी ठराव घेण्याचा आणि गावागावांत सह्यांची मोहीम राबवण्याचा निर्णयही झाला. त्याचबरोबर १५ ऑगस्टला शक्तीपीठ मार्गावर येणाऱ्या शेतांमध्ये मेळावे घेऊन लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे.


आमदार सतेज पाटील यांनी “८६ हजार कोटींचा प्रकल्प आता १ लाख ६ हजार कोटींवर गेला. सरकार कितीही दबाव टाको, शेतकऱ्यांच्या जमिनीवरचा हा महामार्ग होऊ देणार नाही” असा ठाम इशारा दिला. राजू शेट्टी यांनी “पिकाऊ जमिनीचे रक्षण म्हणजेच जमिनीला स्वातंत्र्य देणे” असे सांगत स्वातंत्र्यदिनी मेळावे घेण्याचे आवाहन केले.


आमदार कैलास पाटील यांनी हा प्रकल्प “मुख्यमंत्र्यांचा ड्रीम की क्रीम?” असा सवाल उपस्थित केला. माजी खासदार विनायक राऊत यांनी “शेतकऱ्यांचा कणा मोडणारा हा प्रकल्प हाणून पाडू” असा इशारा दिला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दहा गावांत सह्यांची मोठी मोहीम राबवण्याची घोषणा केली.


दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने १३ ऑगस्टला देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून, शक्तीपीठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येने बिंदू चौकात जमणार आहेत.

थोडे नवीन जरा जुने